#
News & Events

शासकीय अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथक आणि जनकल्याण रक्तपेढी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर व प्लेटलेट्स दान जनजागृती या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिर राबविण्याबरोबरच प्लेटलेट्स दानाचे महत्व ग्रामीण भागातील जनमानसात रुजवणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता.रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी डॉ. आशुतोष काळे(जनकल्याण रक्तपेढी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. पंत , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ यू. एस. काकडे इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. आशुतोष काळे म्हणाले की “रक्तदान शिबीरा मध्ये मुलांचा उत्साह कौतुकास्पद आहे. प्लेटलेट्स दाना चे महत्व सांगताना त्यांनी सांगितले की, एक पिशवी रक्तदान केल्यास त्याचे घटक चार वेगवेगळ्या रुग्णांना फायदेशीर ठरू शकतात ” डॉ. ए. एस. पंत या प्रसंगी सांगितले की “रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान आहे त्यामुळे महाविद्यालयातील सर्वांनी रक्तदान शिबिरात सहभागी होवून रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले ”. प्राचार्य डॉ. ए. एस. पंत , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. यू. एस. काकडे यांनी स्वतः रक्तदान केल्यामुळे मुलांचा उत्साह वाढला . या शिबिरास महाविद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थिनी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये १६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच ११ विद्यार्थ्यांनी प्लेटलेट्स दानासाठी रक्ताचे नमुने दिले. या उपक्रमामध्ये जनकल्याण रक्तपेढीचे श्री.संतोष अंघोळकर यांचे सहकार्य लाभले.राष्ट्रीय सेवा योजना पथक व टीम सृजन यांनी अयोजकाची भूमिका पार पाडली.