Click to change the language

  

#
#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय,अवसरी(खुर्द), येथे दि.१७ डिसेंबर २०१८ ते दि.२१ डिसेंबर २०१८ या दरम्यान स्वयंचल विभागामध्ये “रिसेंट सिनरिओ व फुचर ट्रेंड्स इन आटोमोटीव इंडस्ट्रीज” (Recent Scenario and Future Trends in Automotive Industry) या विषयावर महाराष्ट्रातील विविध शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन संस्थांमधील प्राध्यापकांसाठी एक आठवड्याचा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. तंत्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांनी पुरस्कृत केलेल्या या कार्याक्रमाचे उद्घाटन दि.१७ डिसेंबर २०१८ रोजी, एआरएआय पुणे या संस्थेचे वरिष्ठ उपसंचालक डॉ. कमल वोरा यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनप्रसंगी डॉ. वोरा यांनी भारतातील वाहनांची वाढती संख्या व त्या अनुषंगाने वाहन उद्योगातील प्रगतीबद्दल व अद्ययावत तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली.

या एक आठवड्याच्या कार्यक्रमामध्ये एआरएआय पुणे, सीआयआरटी पुणे तसेच करारो कंपनी रांजणगाव पुणे अशा विविध नामांकित संशोधन संस्था व औदोयोगिक क्षेत्रामधील तज्ञांचे व्याख्याने आयोजित करण्यात आले होते. वरील कार्यक्रमामध्ये तज्ञांनी प्रदूषणविरहित इंधने, इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहने, तसेच वाहन उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान प्राध्यापकांनी महिंद्रा व्हेहिकल्स कंपनी चाकण येथे भेट देऊन वाहननिर्मिती विषयी माहिती घेतली.

सदर कार्यक्रमाचा समारोप दि.२१ डिसेंबर २०१८ रोजी एआरएआय पुणे या संस्थेचे उपसंचालक डॉ. निलकंठ मराठे यांच्या हस्ते झाले. समारोपप्रसंगी डॉ. मराठे यांनी उद्योगक्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची महाविद्यालयातील विद्यार्थांना माहिती होण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्राचार्यांनी प्राध्यापकांसाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.स्वयंचल विभागाचे विभागप्रमुख डॉ. दिलीप पानगव्हाणे यांनी आयोजक म्हणून व डॉ. मच्छिंद्र पाबळे, श्री.विजय ढेपे व श्री.राष्ट्रपाल तेलतुमडे यांनी कार्यक्रमाच्या समन्वयकाचे काम केले.


                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
https://www.Symptoma.es
Website last updated on: