#
News & Events

आपल्या महाविद्यालयाची निवड “BMW Skill next” ह्या उपक्रमाअंतर्गत झालेली होती. सदर उपक्रमाद्वारे BMWIndia चेन्नई यांचेकडून “BMW ट्वीन डीझेल इंजिनआणि transmission system” चा पूर्ण setup विद्यार्थ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान आणि विषयाशी निगडीत प्रात्यक्षिकासाठी उपयुक्त असा प्राप्त झालेला आहे. सदर उपक्रमासाठी देशातील निवडक महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला होता व त्यात आपल्या महाविद्यालयाची निवड झाली हि महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.

सदर उपक्रमाबाबत महाविद्यालायचे प्राचार्य मा. डॉ. ए. एस. पंत व स्वयंचल विभागाचे विभागप्रमुख डॉ. डी. आर. पानगव्हाणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याचबरोबर स्वयंचल विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. एम. जे. पाबळे यांनी सदर setup मिळन्याबबत सतत पाठपुरावा केला. सदर setup हा विद्यार्थ्यासाठी खूप महत्वाचा असून याद्वारे सद्यास्थितीत वाहनासाठी वापरले जाणारे नवीन तंत्रज्ञान विद्यार्थी अवगत करू शकतील.