#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये दि.२८/८/२०१८ रोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. डी. आर.पानगव्हाणे यांच्या हस्ते अॅबिनीशो २k१८ – १९ या दोन दिवसीय राजस्तरीय तांत्रिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

उद्घाटन प्रसंगी डॉ. डॉ. डी. आर.पानगव्हाणे म्हणाले कि, “आजच्या युगात तांत्रिक स्पर्धा या एकी, प्रयत्न व स्वंयमप्रेरणा या द्वारे यशस्वीरीत्या पार पडू शकतात. या सर्व गोष्टी महाविद्यालयातील वीधार्थ्यानी समर्पित होवून केलेल्या दिसून येत आहेत ”. सदर तांत्रिक स्पर्धा दि. २८ व २९/८/२०१८ या दोन दिवशी पार पडली. यामध्ये एकूण २५ तांत्रिक स्पर्धा घेण्यात आल्या. महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकीच्या ४५ महाविद्यालयातील एकूण ११०० स्पर्धकांनी सहभाग नोदंवला.

या वर्षी प्रथमच सर्च मास्टर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अॅबिनीशोच्या दि. २९/८/२०१८ च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाकरीता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे चे माजी संचालक तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे चे माजी कुलगुरू डॉ. ए.ए. घाटोळ उपस्थित होते. अॅबिनीशो २k१८ – १९ चे फार मोठ्या प्रमाणावरचे आयोजन बघून पारितोषिक वितरण प्रसंगी ते म्हणाले की, “अशा तांत्रिक कार्यक्रमामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधन करण्यास प्रेरणा मिळून दळणवळण,वाहतुक व उर्जा या क्षेत्रामध्ये जास्ती जास्त संधी उपलब्ध होतील .”

अॅबिनीशो २k१८ – १९ तांत्रिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकीच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे प्रथम पारितोषिके व बक्षीसे संपादित केली. आर. सि. नायट्रोरेसिंग मध्ये समीर फडतरे व मुनिब चौगुले (आयएसबी अँड एम स्कूल ऑफ टेक्नोलॉजी, नांदे पुणे),पी एल सी मास्टर मध्ये ओमकार कचहरे व मधुरा सूर्यवंशी (विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे VIT PUNE),रोबो सॉकर मध्ये आशिष नायडू व टीम (डी वाय पाटील कॉलेज ऑफ़ इंजिनिअरिंग आकुर्डी , पुणे),ब्लॉक वॉरीअर मध्ये किरण राकतटे (संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कोपरगाव), लेथ वॉर मध्ये प्रशांत ठेंबेकर (ITI Khed), स्पेको फ्रेम मध्ये ऋषीकेश कोरडे व टीम (जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कुरण), सर्च मास्टर मध्ये शिवम अष्टीकर, सी ६० मध्ये गणेश चिंचोलकर, अल्गोरिक्स मध्ये शिवम अष्टीकर व गणेश चिंचोलकर, ,व्हेइकल ट्रबलशुटींग मध्ये सुमेध लगाटे व निरंजन गदादे,इलेक्ट्रो -स्पार्क मध्ये निलेश वेताळ व प्रियांका नलावडे,रोबॉक्स मध्ये गणेश चिंचोलकर व टीम, , कॅटापुल्ट मध्ये मिहीर अवचट व गिरम सिद्धेश्वर.( शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द ) या तांत्रिक कार्यक्रमाकरीता डॉ. आर.एम.वरखेडकर यांनी समन्वयक व श्री जी.एस.दातार यांनी सहसमन्वयक म्हणून काम पाहिले. संजना जाधव हिने विद्यार्थी समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहिणी कुलकर्णी व सुमित भोसले यांनी केले.