#
News & Events

अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरीचे बुद्धीबळ स्पर्धेत यश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालीन बुद्धीबळ स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी येथील सर्वसाधरण विजेतेपदाचा मान मुलींनी संपादन केला तर मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. आर.एस.सी.ओ.ई लोणीकंद, ता.हवेली, जि.पुणे येथे पार पडलेल्या आंतरमहाविद्यालीन पुणे विद्यापीठ स्पर्धेत महाविद्यालयातील मुलींच्या संघाचे प्रतिनिधित्व सृष्टी मुटकुळे, वृषाली वणवे, निलिमा काकुळते, रेणुका ओतारी, वैजयंती गुंडयांनी केले. सृष्टी मुटकुळे हिने तृतीय क्रमांक पटकावित विद्यापीठ संघात स्थान मिळविले. मुलांच्या संघाचे प्रतिनिधित्व स्वप्नील थोकडे, शिवम आष्टीकर, विनायक देव, करण चव्हाण, निखिल शिंदे यांनी सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली.
स्पर्धेत सहभागी संघाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत यांनी अभिनंदन केले. संघाचे व्यवस्थापक एस.बी.थोरात होते तर संघाला प्रशिक्षण व प्रोत्साहन महाविद्यालयातील विद्यार्थी सचिन राठोड याने केले. या यशात जिमखाना प्रमुख डॉ.एन.पी.फुटाणे, श्री.एस.डी.पाटील, श्रीमती. एस.बी.मोरडे यांचा सहभाग होता. आंबेगाव तालुका व परिसरातून सहभागी संघाचे कौतुक होत आहे.