#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात अवसरी (खुर्द) येथे राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा !

दि. २९ ऑगस्ट २०१७ रोजी अवसरी (खुर्द) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडादिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या जिमखाना विभागाने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. सकाळी ७.३० वाजता ६ कि.मी अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पुजनाने व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून संस्थेचे प्राचार्य मा. डॉ. ए. एस. पंत यांच्या हस्ते झाले. मा.प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना स्वस्थ राहण्यासाठी सकाळी व्यायाम करण्याबाबतचे महत्व पटवून दिले आणि या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थांनी सहभाग नोंदविण्यासाठी आव्हान केले. या मॅरेथॉन स्पर्धेत संस्थेतील यंत्र अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा.एस.व्ही.जोशी, स्वयंचल अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.डी.आर.पानगव्हाणे, संगणक अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.एस.यू.घुम्बरे, अणुविद्युत अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. एम. एस. नागमोडे, इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला.या ६ कि.मी. च्या मॅरेथॉन स्पर्धेत संस्थेतील विद्यार्थी कु.कोकणे शिवाजी प्रथम आला. विद्यार्थिनीं मध्ये कु. नलवाडे प्रियांका प्रथम आली. तर पुरुष गटात श्री.ए.जी.जाधव  व महिला गटात श्रीमती. आर.के. डवणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सदर कार्यक्रमाच्या आयोजना करिता डॉ.एन.पी.फुटाणे, श्री.पाटील एस. डी, श्री.थोरात एस.बी, श्रीमती. मोरडे एस.बी यांनी काम केले.