#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजने मार्फत दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्सहात संपन्न

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजने मार्फत दि. १८ व १९ जानेवारी, २०१९ या कालावधीत दोन दिवसीय विनामुल्य व्यक्तिमत्व विकास शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. विविध सत्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकांमधील व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे हा या अनोख्या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.

आंबेगाव तालुक्यातील जवळपास ५० माध्यमिक शाळा या शिबिरामध्ये सहभागी झाल्या. यामध्ये ५० शिक्षक व १५० विद्यार्थ्यांचा (इ. ८ वी, ९वी, १०वी) समावेश होता. या दोन दिवसीय शिबिरात शिक्षकांसाठी ‘वेळेचे व्यवस्थापन, विद्यार्थी विकासाचा दृष्टीकोन, डिजिटाजेशन, झाडे लावा-जीवन रुजावा, ई-लर्निंग’ या सत्रांचा तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘युवानेतृत्व विकास, रोबोंची ओळख, नोकरीविषयक संधी, खेळांचे महत्व, सॉफ्ट स्किल्स’ या सत्रांचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय शिबिरात सहभागी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व विभाग, प्रयोगशाळा व विविध तांत्रिक उपक्रमांची ओळख अनोख्या सहलीच्या माध्यमातून करून देण्यात आली.

या दोन दिवसीय शिबिरात डॉ. सतीश केरकळ, डॉ. राम गुडगीला, श्री. अतुल डुंबरे, श्री. विवेक प्रकाश, अॅड. तुषार वायाळ, डॉ. महेंद्र घागरे, श्री. अमर कानडे, श्री. विश्वजीत काशीद इ. वक्त्यांनी विविध सत्रांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी डॉ. राम गुडगीला (संस्थापक-अध्यक्ष, नेटवर्क फॉर युथ, पुणे), डॉ. सतीश केरकळ(प्र. प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अवसरी) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत, रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. मंगेश पांचाळ इ. मान्यवर उपस्थित होते. व्यक्तिमत्व विकास शिबिरा च्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळून ते जगाच्या प्रत्यक क्षेत्रात अग्रेसर राहतील असे डॉ. अविनाश पंत यांनी सांगितले

शिबिराच्या समारोप समारंभासाठी उद्योजक श्री. रुपेश कदम (संचालक, ग्रीनिजो सिस्टिम्स प्रा. लि., पुणे) व आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री. विनोद बोंबले हे उपस्थित होते. या शिबिरासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. मंगेश पांचाळ, श्रीमती प्राजक्ता पिंपळकर, अनुराग मिश्रा, दिप्ती पवार, विशाल होळकर, गीतांजली साबळे, योगेश घुले, हृषीकेश आवटे, अपूर्वा लबडे, शुभम घोडके व इतर सर्व रासेयो स्वयंसेवकांनी आयोजकाची भूमिका बजावली.