#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.मा.प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.ए.एस.पंत म्हणाले की, आपण हा ७० व्या स्वातंत्र्यदिनी आपण नवभारत निर्मितीचा संकल्प प्रत्यक्ष कृतीत आणूया. विद्यार्थ्यांच्या मनातील संकल्पना त्यांनी मनात न ठेवता त्या सांगितल्या पाहिजेत ज्यामुळे महाविद्यालय प्रगती पथावर राहील.  भारत स्वातंत्र्याकारेता क्रांतीकाराकानी तसेच भारत मातेला संरक्षित ठेवण्याकारीता शूरवीर जवानांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून देशासाठी देशसेवा तसेच देशरक्षण करण्याची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे असे सांगितले

या स्वातंत्र्यदिनी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा ही “मतदार यादीत नाव नोंद करून लोकशाही बळकट करणे” या विषयावर घेण्यात आली. निबंध स्पर्धेमध्ये गजानन होळकर अंतिम वर्ष (यंत्र) अभियांत्रिकी या विद्यार्थ्यांने प्रथम पारितोषिक मिळवले. वक्तृत्व स्पर्धेमध्ये नीलम शेळके तृतीय वर्ष (यंत्र ) अभियांत्रिकी हिने प्रथम पारितोषिक मिळवले. यावेळी विद्यार्थ्यांनी जयोस्तुते  हे समुहगायन केले. यावेळी महाविद्यालयाच्या सांस्कृतीक समितीने मानवता व नारी सुरक्षा” यावरती पथनाट्य सादर केले.याला सर्वांनी प्रतिसाद दिला. या पथनाट्यामध्ये मुलींनी आता संरक्षणाकरिता दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वसंरक्षणाकरिता सिद्ध झाले पाहिजे. तसेच स्वसंरक्षणाकरिता कोणते उपाय अवलंबवावे हे पथनाट्याद्वारे दाखविले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट हा स्वच्छता पंधरवाडा घेण्यात आला. स्वच्छता पंधरवाड्याची सांगता प्लास्टिक कचरा निर्मुलनाद्वारे करण्यात आली . या अभियानात सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

सदरील ध्वजारोहण अंतर्गत कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ.यू.एस.काकडे व जिमखाना प्रमुख डॉ.एन.पी.फुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सोनावणे तृतीय वर्ष (यंत्र) व स्वप्नील लोणकर  तृतीय वर्ष (स्थापत्य) अभियांत्रिकी यांनी केले.