#
News & Events
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात पदवीप्रदान सोहळा संपन्न

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये दि.२३/२/२०१८ रोजी शैक्षणीक वर्ष २०१६-१७ च्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात पार पडला. प्रथम पदवी ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे चे संचालक डॉ. बी. बी. आहुजा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सरस्वती स्तवन गायनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर सर्वांनी विद्यापीठ गीत गायन केले.

डॉ.एम. जे. पाबळे महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांनी विद्यापीठ झेंडा हाती घेवून मिरवणुकीचे नेतृत्व केले तसेच आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत व कार्यक्रमाची प्रस्तावना केली. या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, महाविद्यालयातील ९०% विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व प्रथम श्रेणी विशेष प्रावीन्या सह उतीर्ण झाले आहेत यावरून विध्यार्थ्यांची गुणवत्ता दिसून येते .चांगले रहा व चांगले काम करा असा उपदेश केला व भारतीय संस्कृती जगास पुढे नेणारी आहे असे सांगितले.

या प्रसंगी प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी शैक्षणीक वर्ष २०१७-१८ मध्ये महाविद्यालाने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे विश्लेषण केले जसे की, विद्यार्थ्यांनी गो-कार्टिंग स्पर्धा, रोबोकॉन स्पर्धेत मिळवलेले यश, विविध आंतरमहाविद्यालीन, वेटलिफ्टिंग, बुद्धिबळ, खो-खो स्पर्धांमध्ये तेसच भीमाशंकर करंडक २०१८ विजेता इ., तांत्रिक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी लाक्षणिक यश मिळविले आहे असे सांगितले.

या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे डॉ. बी.बी. आहुजा यांनी अनमोल मार्गदर्शन करून उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली. या प्रसंगी ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वेळेनुसार बदलणारी जागतीक आवाहने स्वीकारली पाहिजे, बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षक व विद्यार्थ्यांनी बदलेले पाहिजे. तंत्रज्ञानाने एक समस्या सोडवली जाते परंतु दुसरी समस्या उभी राहते. यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात ड्रायव्हर विरहीत कार येणार त्यामुळे सद्यस्थितीत काम करणाऱ्या ड्रायव्हरांचा प्रश्न उभा राहील. तसेच त्यांनी येणाऱ्या १५ ते २० वर्षात बॅटरीवर चालणारी वाहने सगळीकडे वापरात येतील त्यामुळे यंत्र व स्वयंचल अभियंतांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे सद्यस्थितीत अभियंता हा सर्व क्षेत्रात निपुण असला पाहिजे तरच त्याला नोकरीची संधी उपलब्ध राहील. यावेळी विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे नोकरी घेणाच्याएवजी तुम्ही नोकरी देणारे बनले पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच येणारे युग हे रोबोटिक्स व आर्टीफिसीयल इंटीलिजन्स चे राहणार आहे असे सांगितले. प्रत्येक दिवशी तुम्ही वेगळ्या विचाराने काम करून जागतिक आवाहने स्वीकारुन जागतिक समस्या सोडवल्या पाहिजेत .

या पदवी प्रदान समारंभाकरीता यंत्र, अणुविद्दुत, उपकरणीकरण, संगणक, स्थापत्य, स्वयंचल या शाखेचे एकूण २५० विद्यार्थी पदवीग्रहणाकरीता उपस्थित होते. पदवीग्रहण हा त्यांचा आयुष्यातील महत्वाचा क्षण होता. यावेळी प्रत्येक शाखेच्या विभागप्रमुखांनी त्यांच्या शाखेच्या विद्यार्थ्यांच्या नावाचे वाचन केले व सन्मानिय पाहुणे डॉ. बी.बी. आहुजा व मा. प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास सर्व विभागांचे विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. जोशी, डॉ. डी. आर. पानगव्हाणे, डॉ. एस. यु. घुमरे, डॉ. डब्लु. एम. देऊळकर, डॉ. एम.आर. बोनगुलवार, डॉ. एम.एस. नागमोडे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.