#
News & Events

इंडियन कार्टिंग चॅम्पियनशीप सीझन -2 गो-कार्टिंग स्पेर्थेत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे लक्षणीय यश

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी कोल्हापुर येथील मोहीते रेसिंग अकॅडमी येथे नेक्सस मोटर्स स्पोर्ट्स आयोजित इंडियन कार्टिंग चॅम्पियनशीप सीझन -2 गो-कार्टिंग स्पर्धा दि:१२/०१/२०१८ ते १६/०१/२०१८ आयोजित करण्यात आली होती,या स्पर्धेत विध्यार्थ्यांनी टीम फलंक्स(Team PHALANX )म्हणुन सहभाग नोंदविला. देशभरातील १४० संघांनी सहभाग घेतला,या स्पर्ध्येत टीम फलंक्स(Team PHALANX) ने उत्तम कामगिरी बजावत नामांकित संघांना पराभूत करत अखिल भारतीय रँक-७ वा क्रमांक पटकवला. संघ प्रमुख म्हणुन ललित शेंड्घे (अंतिम वर्ष स्वयंचल अभियांत्रिकी) व चालक सुरज गायकवाड (तृतीय वर्ष स्वयंचल अभियांत्रिकी) यांनी भूमिका निभावली. विध्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ.ए.एस्.पंत व प्रा. डॉ. डी. आर. पानगव्हाणे, प्रा. एस. व्ही. जोशी, डॉ. एम. एस. नागमोडे, डॉ. एम. जे. पाबळे तसेच कर्मशाळा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत यश संपादित कलेल्या विदायार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश पंत यांनी अभिनंदन केले.