#
News & Events

प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई),व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सूचनांनुसार दि १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट दरम्यान आठ दिवसीय प्रेरण कार्यक्रमाचे (इंडक्शन प्रोग्राम) चे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने झाले .यावेळी ते म्हणाले कि, महाविद्यालयात सदयस्थितीत उच्चशिक्षित अनुभवी अध्यापक उपलब्ध झाल्यामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे व विद्यार्थ्यानी याचा पुरे पूर उपयोग करून घ्यावा. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याकरिता शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये शंभर टक्के यशा सोबत इतर उपक्रमात ई यंत्र , रोबोटिक्स , रेसिंग कार ई अनेक स्पर्धांमध्ये हिरहिरीने सहभागी होवून स्वत: मधील कौशल्य विकसित करावीत. सामाजिकबांधिलकी सगळ्यांना असलीच पाहिजे त्यासाठी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आहे. वृक्षारोपण द्वारे ग्रीन कॅम्पस करण्याचा मानस आहे त्यासाठी सर्वांनी पुढे यावे. असे आवाहन त्यांनी केले .

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता उपयुक्त वातावरण निर्माण करणे, त्यांच्या शैक्षणिक आवडी आणि उपक्रमांना प्रोत्साहन देणे ,शिक्षकांमध्ये नातेसंबंध निर्माण करणे, एक निरोगी दैनंदिनी तसेच, एकमेकात प्रेम संघभावना,आत्मविश्वासाची भावना, संवेदनशीलता आणि स्वत: ची समज विकसित करून स्वयंम प्रेरना तयार करणे हा उद्देश आहे. आठ दिवसीय प्रेरण कार्यक्रमामध्ये , सार्वत्रिक मानवी मूल्ये वाढी करता मार्गदशन ,संगीत ,नृत्य ,चित्रकला,भारतीय खेळ ,टेकडी चढणे ,अवसरी गावाला भेट, वायुप्रदूषण,जलप्रदूषण फिल्म,ई .अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . प्रत्यकी २४ विद्यार्थ्यांना एक तज्ञ शिक्षक (मेंटर )नेमण्यात आला आहे . यावेळी एकूण २५० विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी सर्व पालक व विद्यार्थ्यांचे श्रीमती एच.एच.राक्षे प्रथम वर्ष समन्वयक यांनी जल्लोषात स्वागत केले .या प्रसंगी सर्व विभागप्रमुखांनी शाखानिहाय महाविद्यालयातील प्रत्येक शाखेचे महत्व विषद करून प्रत्येक शाखेकरीता महाविद्यालयात असलेल्या सुविधाबाबत मार्गदर्शन केले. उपयोजित विभागचे विभागप्रमुख डॉ यु. एस. काकडे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व विद्यापीठाकडून येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. महाविद्यालयाचे प्रभारी प्रबंधक श्री.सी.ए. सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजात येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी डॉ.एस. एस. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट वाढले असून सदरील वाढीकरिता महाविद्यालय करत असलेल्या उपाय योजना याबाबत मार्गदर्शन केले.

सहाय्यक ग्रंथपाल श्री. व्ही .जी .जगताप यांनी महाविद्यालयात असलेल्या ग्रंथ संपदेच्या उपलब्धतेबाबत तसेच ऑनलाइन ई.बुक्स, स्पर्धापरीक्षा बाबत उपलब्ध सुविधा याबाबत मार्गदर्शन केले.कुलमंत्री श्री.एम.डी.पांचाळ व श्रीमती डॉ .के व्ही. ठाकुर (मुलांचे व मुलींचे वसती गृह) ,यांनी वस्तीग्रहाचे नियम व वस्तीग्रहात पुरवण्यात येणाऱ्या सुविधाबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी डॉ.एम.जे.पाबळे यांनी अभियांत्रिकीच्या परीक्षेसंबंधी मार्गदर्शन केले.जिमखाना अधिकारी डॉ. एन.पी.फुटाणे यांनी रगिंग प्रतिबंधक कायदे ,महाविद्यालयाने रगिंग निर्मुलनाकारीता केलेल्या उपाययोजना,येथे कोणत्याही प्रकारची रगिंग होत नाही असे नमूद केले. या कार्यक्रमामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. प्रेरण कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता समन्वयक म्हणून डॉ. एम. आर. बोनगुलवार, श्री एन.डी. पडवळे, श्री के. बी. बनसोडे, श्रीमती एच. एच. राक्षे काम पहात आहेत. या कार्यक्रमास सर्व विभागांचे विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. जोशी, डॉ. डी. आर. पानगव्हाणे, डॉ. एस. यु. घुमरे, डॉ. डब्लु. एम. देऊळकर, डॉ. एन.एस.नेहे , डॉ. एम.एस. नागमोडे, डॉ यु. एस. काकडे सर्व अधिकारी व कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा चव्हाण व ओम वाघ यांनी केले.