#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकरीता  प्रेरन कार्यक्रमाचे (इंडक्शन प्रोग्राम) चे आयोजन

महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई),च्या सूचनानुसार दि .१ ते ५ ऑगस्ट दरम्यान पाच दिवसीय प्रेरन कार्यक्रमाचे (इंडक्शन प्रोग्राम) चे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने झाले .यावेळी ते म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांनी स्वयंम प्रेरनेणे प्रेरित होऊन त्यांची ध्येय प्राप्त केली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी फक्त गुणपत्रक अथवा पदवी प्राप्त न करता त्यासोबत त्यांनी नवीन तंत्रज्ञान  अवगत करून घेतले पाहिजे असे सांगितले.तसेच मुलांनी महाविद्यालयात व  महाविद्याल्याबाहेर होणाऱ्या विविध स्पर्धामध्ये भाग घेवून आपली गुणवत्ता सिद्ध करावी असे सांगण्यात आले. सदरील महाविद्यालय पुढील काळात अग्रगण्य गणले जाईल असे सांगितले. 

यावेळी  विज्ञान आश्रम पाबळ चे कार्यकारी संचालक डॉ .योगेश कुलकर्णी यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे व दुसऱ्याकरीता रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात . देशातील गंभीर प्रश्न समस्या त्यांनी शोधल्या पाहीजीत व त्यांच्या तांत्रिक क्षमतेने त्या सोडवाव्यात.

या कार्यक्रमात  विद्यार्थ्यांना आरामदायी वातावरण निर्माण करणे, त्यांच्या शैक्षणिक आवडी आणि उपक्रमांना  प्रोत्साहन देणे ,शिक्षकांमध्ये नातेसंबंध निर्माण करणे, एक निरोगी दैनंदिनी तसेच, एकमेकात प्रेम संघभावना,आत्मविश्वासाची भावना, संवेदनशीलता आणि स्वत: ची समज विकसित करून  स्वयंम प्रेरना तयार करणे हा उद्देश आहे. पाच दिवसीय प्रेरन कार्यक्रमामध्ये , सार्वत्रिक मानवी मूल्ये वाढी करता मार्गदशन ,संगीत ,नृत्य ,चित्रकला,भारतीय खेळ ,टेकडी चढणे ,अवसरी गावाला भेट, वायुप्रदूषण,जलप्रदूषण फिल्म,ई .अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . प्रत्यकी २० विद्यार्थ्यांना एक तज्ञ शिक्षक (मेंटर )नेमण्यात आला आहे . यावेळी एकूण ४०० विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

यावेळी सर्व पालक व विद्यार्थ्यांचे श्रीमती एच.एच.राक्षे प्रथम वर्ष समन्वयक यांनी जल्लोषात स्वागत केले .या प्रसंगी सर्व विभागप्रमुखांनी शाखानिहाय महाविद्यालयातील प्रत्येक शाखेचे महत्व विषद  करून प्रत्येक शाखेकरीता महाविद्यालयात असलेल्या सुविधाबाबत मार्गदर्शन केले. उपयोजित विभागचे विभागप्रमुख डॉ यु. एस. काकडे  यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व विद्यापीठाकडून येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कुलमत्री  श्री.टी.टी.वाघमारे व श्रीमती वाय.एन.चौधरी (मुलांचे व मुलींचे वसती गृह) , यांनी वस्तीग्रहाचे नियम व वस्तीग्रहात पुरवण्यात येणाऱ्या सुविधाबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी डॉ.एम.जे.पाबळे यांनी अभियांत्रिकीच्या परीक्षेसंबंधी मार्गदर्शन केले.जिमखाना अधिकारी डॉ. एन.पी.फुटाणे यांनी रगिंग प्रतिबंधक कायदे ,महाविध्यालयाने रगिंग निर्मुलनाकारीता केलेल्या उपाययोजना,येथे  कोणत्याही प्रकारची रगिंग होत नाही असे नमूद केले.

या कार्यक्रमामुळे  प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. प्रेरण कार्यक्रमाच्या  आयोजनाकरीता समन्वयक म्हणून डॉ.एस.ए.सोनवणे (सहयोगी प्रा.यंत्र ),    श्रीमती एच.एच.राक्षे ,श्री.व्ही.पी.जाधव (सहाय्यक प्रा.उपयोजित विज्ञान ) काम पहात आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी कुलकर्णी  व पूजा चव्हान  यांनी केले.