#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द येथे प्राध्यापकांसाठी कार्यशाळा

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) येथे दि. ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०१८ या कालावधी मध्ये “रीसेंट ट्रेंड्स इन रीनीयुवेबल एनरजी टेकक्नोलॉंजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट” (Recent Trends in Renewable Energy Technology for Sustainable Development) या विषयावर एक आठवड्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन सरदार वल्लभभाई राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (SVNIT) सुरत गुजरात या संस्थेचे यंत्र अभियांत्रिकी विभागाचे ,डॉ पी. व्ही. भाले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाणे झाली. प्रथम कार्यशाळेचे समन्वयक प्रा एस. व्ही. जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले व कार्यशाळेचे प्रयोजन सांगितले या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित पाहुणे डॉ पी. व्ही. भाले म्हणाले की “एखाद्या देशाची प्रगती हि त्या देशात प्रती माणशी वापरली जाणारी वीज यांच्यावर ठरविली जाते.भारता सारख्या विकसनशील देशामध्ये वीजनिर्मित कमी होत असल्यामुळे हे प्रमाण सरासरी प्रती माणशी वीज वापराच्या बरेचशे खाली आहे.त्या करिता आपल्या देशातील वेगवेगळे उर्जा स्त्रोत मधून पर्यावरणास हानी करणाऱ्या उर्जा निर्मिती मध्ये संशोधन मोठ्या प्रमाणात चालू आहे. या सर्व उर्जा स्त्रोतामधील अ पारंपारिक उर्जा स्रोत हा आपल्या देशाच्या भौगोलिक रचनेमुळे हा एक मोठा उर्जा स्त्रोत आहे. या मध्ये प्रामुख्याने सौर ऊर्जा व पवन ऊर्जा स्त्रोत हे निसर्गाला कोणतीही हानी पोहचवत नाही. त्यामुळे या क्षेत्रातील पुढील काळात मोठी संधी निर्माण होणार आहे.”

या प्रसंगी डॉ ए. एस. पंत म्हणाले की “ सद्यस्थितीत जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्याप्रमाणात उरजेची गरज वाढत आहे. विद्यार्थी हा समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. जर या विद्यार्थ्यांना अ पारंपारिक ऊर्जा स्त्रोत या विषयाचे तांत्रिक ज्ञान व पुढील काळात या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या संधी या विषयाचे ज्ञान अवगत करावयाचे असेल तर प्रतमत: प्राध्यापकांना सदरबाबत चे अद्यावत तंत्रञान देणे गरजेचे आहे. हि संधी लक्ष्यात घेऊन या ही कार्यशाळा आयोजित केली आहे.” सदर कार्यशाळा संचालक तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई यांनी मान्यता दिली असून सदर कार्यशाळेसाठी राज्यातील अनेक शासकीय व खाजगी अनुदानित अभियांत्रिकी तंत्रनिकेतन मधील प्राध्यापक उपस्थित आहेत.सदर कार्यशाळेत प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी नामांकित शिक्षण संस्थेतील व उद्योग क्षेत्रातील उच्च शिक्षित तज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या समन्वयका चे काम प्रा एस. व्ही.जोशी, सहसमन्वयक म्हणून डॉ.एस.व्ही.करमारे व श्री ए .एस.माने पाहत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बी .ए .पाटील यांनी केले .