#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय,अवसरी(खुर्द), येथे दि. २८/१/२०१९ ते १/२/२०१९ या दरम्यान अणुविद्युत व उकरनीकरण विभागामध्ये “अॅडव्हान्सेस इन इंटरनेट ऑफ थिंग्ज” (Advances in Internet of Things) या विषयावर महाराष्ट्रातील विविध शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन संस्थांमधील प्राध्यापकांसाठी एक आठवड्याचा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी पुरस्कृत केलेल्या या कार्याक्रमाचे उद्घाटन दि.२८/१/२०१९ रोजी अॅसेन्ट्युअर (Accenture), पुणे या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील राजपूत यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनप्रसंगी श्री. सुनील राजपूत यांनी येणारा काळ हा इंटरनेट ऑफ थिंग्ज चा असेल व त्यामधील प्रगतीबद्दल व अद्ययावत तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली .

या एक आठवड्याच्या कार्यक्रमामध्ये इंटलेक्ट टेकनॉलॉजीज चे व्यवस्थापकीय संचालक श्री. राहुल गुप्ता, फोर्ब्स मार्शलचे पुणे चे वरीष्ठ संचालक श्री.विनोद जोशी, मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय,नाशिक चे सहाय्यक प्राध्यापक श्री.एन.एल.भाले, ऑटो इंटेल चे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप श्रॉफ अशा विविध नामांकित संशोधन संस्था व औदोयोगिक क्षेत्रामधील तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT) मधील नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाविषयी तसेच जगातील प्रत्येक क्षेत्रात (औदोयोगिक, वैद्यकीय,सामाजिक, सैन्य,विमान, घरगुती इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे नियंत्रण ई.) कसा वापर होत आहे याबाबत मार्गदशन करण्यात आले .जगातील सर्वदूरच्या सर्व क्षेत्रातील वस्तू आपण इंटरनेट ऑफ थिंग्ज द्वारे नियंत्रण करू शकतो . या कार्यक्रमादरम्यान प्राध्यापकांनी महाविद्यालयातील रोबोटिक्स रीसर्च व इयंत्र लॅब ला भेट दिली.व विद्यार्थांनी सदरील स्पर्धात सहभाग घेऊन कसे यश संपादित केले आहे या बाबत माहिती सांगीतली.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ.एम.आर.बोनगुलवार व डॉ.एम.एस.नागमोडे यांनी काम पाहिले.श्री.के.एच. कौडिकी व डॉ.एन.पी. फुटाणे यांनी सह समन्वयक म्हणून काम पाहिले.