#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात अॅबिनीशो २के १७ – १८ तांत्रिक स्पर्धा संपन्न

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये दि.१५/९/२०१७ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या हस्ते अॅबिनीशो २k१७ – १८ या दोन दिवसीय राज्यस्तरीय तांत्रिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी डॉ.ए.एस.पंत म्हणाले कि, “आज अभियंता दिनी आपण अॅबिनीशो २k१७ – १८ चे  उद्घाटन करत आहोत ही गर्वाची बाब आहे. आपण सर्व तरुण अभियंत्यांनी देशाकरीता समर्पित होऊन पूर्ण क्षमतेने काम केले पाहिजे, विद्यार्थ्यांनी त्यांच्या नियमित शैक्षणिक कामाबरोबर नवनिर्मितीचे काम केले पाहिजे, तसेच त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत जीवन जगले पाहिजे असे सांगितले.”

सदर तांत्रिक स्पर्धा दि. १५ व १६/९/२०१७ या दोन दिवशी पार पडली. यामध्ये एकूण ३० तांत्रिक स्पर्धा घेण्यात आल्या. महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकीच्या महाविद्यालयातील  एकूण १०७९  स्पर्धकांनी सहभाग नोदंवला. या वर्षी प्रथमच नायट्रोजन कार रेसिंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा आयआयटी, सी.ओ.ई.पी. पुणे अशा निवडक महाविद्यालयामध्येच घेण्यात येते. अॅबिनीशोच्या दि. १६/९/२०१७ च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाकरीता सीमेन्स इन्फोरमेशन सिस्टिम पुणे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. राजेश अग्रवाल उपस्थित होते. पारितोषिक व बक्षिश वितरण प्रसंगी ते म्हणाले की, “विह्यार्थ्यानी सद्यस्थिती नुसार जगाला लागणाऱ्या गरजानुसार काम निवडून त्यामध्ये उत्कृठ काम करणे गरजेचे  आहे याकारेता त्यांनी बुलेट ट्रेन, इंडीगो विमान सेवा यांची उदाहरणे दिली. .सर्वांनी डीजिटलाझेशन चा वापर वाढवला पाहिजे . तसेच विह्यार्थ्यानी उत्कटतेने आवडीने शिक्षण घेतले पाहिजे व येणारी सर्व आव्हाने स्वीकारली पाहेजे .अशा प्रकारच्या आयोजनामुळे उद्योगांना लागणाऱ्या अभियंत्याची तसेच त्यांना लागणाऱ्या तांत्रिक क्षमता यांची विद्यार्थ्यांमध्ये वाढ होईल.”

अॅबिनीशो २k१७ – १८ तांत्रिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकीच्या महाविद्यालयातील  विदयार्थी नी  खालिल प्रमाणे प्रथम पारितोषिके  व बक्षीसे संपादित केली . आर. सि.नायट्रो रेसिंग मध्ये श्रवण यादव,आशिष पाटील (जे.एन.इ.सी.औरंगाबाद), रोबो रेस ,फानटमवे ,रोबो सॉसर  व ब्लाइंड बोट मध्ये भूषण पाटील, मनोज नेरकर व आशिष चौगुले  (आर सी पी आय टी शिरपूर धुळे )    पीरेट ब्याटल मध्ये वेदांत धनवटे,अभिजित गीते (शा.अ.स म .अवसरी खुर्द),    सरकीट्रीक्स मध्ये सुरज कल्याणी व अमृता तोडीवले (शा.अ.स म .अवसरी खुर्द )  लाइन ट्रेसिंग मध्ये शुभम आहेर फराख खान, जय बनकर (एस.सी.ओ.ई कोपरगाव), पेपट्रीक्स मध्ये ज्योती खाकरे व प्रणाली जाधव (शा.अ.स म .अवसरी खुर्द) , टाऊन प्लांनिंग मध्ये अक्षय माने, ओंकार पाटील  धीरज पाटील  (शा.अ.स म .अवसरी खुर्द)   कॉन  क्युब   मध्ये निलेश टकले,प्रमोद कांबळे ,शुभम घोलप (शा.अ.स म .अवसरी खुर्द)   जावा जेम मध्ये प्रतीक्षा वाघ(शा.अ.स म .अवसरी खुर्द) ई. अनेक स्पर्धांमध्ये यश संपादित केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते .यश संपादित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालायचे प्राचार्य डॉ . डॉ.ए.एस.पंत यांनी अभिनंदन केले आहे. या तांत्रिक कार्यक्रमाकरीता डॉ. आर.एम.वरखेडकर यांनी समन्वयक व डॉ.एन.पी.फुटाण यांनी सहसमन्वयक म्हणून काम पाहिले. ऋशिकेष कांबळे व वृषाली सोनवणे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचे काम पाहिले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  हितेशी राठोड (तृतीय वर्ष संगणक) व स्वप्नील लोणकर (तृतीय वर्ष स्थापत्य )  यांनी  केले.