#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) येथे महिला सक्षमीकरणावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

   महाराष्ट्र राज्य महिला आयोग पुरस्कृत “डिजिटल युगात महिला सक्षमीकरणातून शाश्वत सामाजिक व आर्थिक विकास” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन मा. नामदार व माजी विधानसभा अध्यक्ष ,माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दिलीपराव वळसे पाटील व श्रीमती सुनंदाताई राजेंद्र पवार बचत गट पुणे जिल्हा अध्यक्ष,कृषी विकास प्रतिष्ठान ,बारामती यांच्या हस्ते दि.३/३/२०१८ रोजी दीपप्रज्वलनाणे करण्यात आले. कार्यशाळेच्या समन्वयक श्रीमती निवेदिता वाघ यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक व कार्यशाळेचे प्रयोजन सांगितले.

याप्रसंगी बोलताना मा.नामदार दिलीपराव वळसे पाटील म्हणाले कि, “देशाच्या लोकसंखेपैकी ५० % महिला आहेत. आपला देश महासत्ता होण्याच्या दृष्टीने महिला सक्षमीकरण करणे गरजेचे आहे . सद्यस्थितीत सर्व क्षेत्रात महिला पुरुषापेक्षा आघाडीवर आहेत. महिलांनी देशाच्या विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर उत्तम कामगीरी बाजवली आहे .असे असतानाही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणखी खूप प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या महिलांना विविध संकटाना सामोरे जावे लागते जसे की आपले सैनिक सीमेवर शहीद झाल्याने ,गरीब शेतकरी आत्महत्या करण्याने महिला निराधार होते , अशावेळी तिला प्रोत्साहन देऊन स्वतःच्या पायावर उभे करून त्यांचे सक्षमीकरण करणे ही काळाची गरज आहे. याकरिता महिलांसाठी मोठ्याप्रमाणावर संस्था ,पतसंस्था बचतगट स्थापन करणे आवशक आहे जेणेकरून देशाच्या विकासाला गती मिळेल.”

यावेळी कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे श्रीमती सुनंदाताई पवार यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगून महिलांकरिता बचतगट ची संकल्पना राबविल्यामुळे महिलांची शून्यातून कशी प्रगती झाली व त्यांचा आत्मविश्वास कसा वाढला हे सांगितले . सद्यस्थितीतील समस्यांकडे बघता बचत गटाच्या माध्यामातून सर्वाना सकस अन्नाचा पुरवठा करणे,मिळावट विरहीत डाळी व तेल ई .ची मागणी वाढत असल्याने लघु उद्योगाकडे एक संधी म्हणून पहावे व उद्योजक बनावे असे सांगितले. मुलीना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की औद्योगिक क्षेत्रात संगनकीकरण येत असल्यामुळे नोकरीच्या संधी कमी होत आहेत त्यामुळे मुलीनी सुध्दा विविध क्षेत्रात संधी शोधून उद्योजक बनावे.

यावेळी प्राचार्य डॉ.ए.एस. पंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की , “महाविद्यालयात तांत्रिक कार्यक्रमासोबतच समाजपयोगी कार्यक्रम राबविले जातात.”याकरिता त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या समाजपयोगी कार्यक्रमाची माहिती सांगीतली .डॉ विद्या बाळ संपादिका व सामाजिक कार्यकर्त्या पुणे ,यांनी स्री पुरुष समानता यावर प्रभोधन केले . स्रीयांनी अंधश्रद्धेच्या आहारी जाण्यापेक्षा वेज्ञानिक दृष्टीकोन ठेवून स्व:ता चा विकास करावा .परस्पर समुपदेशन ,विचारविनिमय करून कौटुंबिक व सामाजिक समस्या सोडवाव्यात असे त्यांनी सांगितले.

श्रीमती मेधा दुभाषी –प्राध्यापक सहकारी व्यवस्थापन संस्था यांनी केंद्र सरकार नाबार्ड मार्फत विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्याचा लाभ घ्यावा .तसेच सध्याच्या डिजिटल युगात एआय (आर्टी फीशीयाल इंटेलिजन्स) तंत्राचा वापर करून महिला सक्षमीकरणामध्ये त्याचा वापर करावा असे सांगितले . श्री विलास शिंदे –संचालक सह्याद्री फार्म नाशिक, यांनी –कृषि क्षेत्रातील उत्पादन तंत्रज्ञाना चा वापर करून उत्पादन वाढवले पाहिजे. निर्यात व व्यापार यामधील संधीचा पुरेपूर वापर करून घ्यावा . अत्याधुनीक तंत्रज्ञान जीपीस ,हवामान बदल ची माहिती ई. ज्ञान आत्मसात करावे याबाबत मार्गदर्शन केले .डॉ वृषाली जाधव ,व डॉ मानकर –उपजिल्हा आरोग्य केंद्र मंचर –यांनी स्रीयांचे विविध आजार व त्यावरील उपचार यावर मार्गदर्शन केले.अड .संध्या बाणखेले –यांनी महिलाविषयी चे हक्क व कायदे कौटुंबिक हिंसाचार या कायद्याविषयी महिलांना अवगत केले . डॉ .एस .यु घुबरे विभागप्रमुख संगणक अभियांत्रिकी यांनी डीजीटल युगात इंटरनेट चे महत्व विषद करून ग्रामीण भागातील महिलांनी इंटरनेटचा वापर केल्यास महिलासक्षमीकरण होईल तसेच भारत सरकारच्या डीजीटल इंडिया या योजनेची पूर्तता होईल असे सांगितले

या कार्यशाळेत आंबेगाव ,जुन्नर व खेड तालुक्यातील ग्रामपंचायत ,पतसंस्था ,सोसायटी, बचतगटातील महिला, अशा ६० व संस्थेच्या सर्व महिला अधिकारी ,कर्मचारी व विधार्थीनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला.सदरील कार्यशाळेत महिलांना डीजीटल तंत्रज्ञान,शेती ,बचतगट, महिला हक्क व कायदे विषयक मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेकरीता श्रीमती निवेदिता वाघ यांनी समन्वयक तर श्रीमती दीपमाला त्रीमुखे श्रीमती प्राजक्ता पिंपळकर यांनी सहसमन्वयक म्हणून काम पहिले . या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मा. नामदार व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील , श्रीमती सुनंदाताई राजेंद पवार –बचत गट पुणे जिल्हा अध्यक्ष ,डॉ विद्या बाळ-संपादिका व सामाजिक कार्यकर्त्या,श्रीमती सुषमा कानडे – सभापती आंबेगाव पंचायत समिती ,श्री विलास शिंदे –संचालक सह्याद्री फार्म नाशिक ,श्री रवींद्र सबनीस –तहसीलदार आंबेगाव.श्रीमती मेधा दुभाषी –प्राध्यापक सहकारी व्यवस्थापन संस्था , डॉ.ए.एस.पंत-प्राचार्य ,श्रीमती संध्या बाणखेले –कायदा तज्ञ,श्री काळभोर –गटविकास अधिकारी , श्रीमती अरुणाताई थोरात –जिल्हा परिषद सदस्य, श्री विष्णू काका हिंगे –पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादन कात्रज डेअरी यांचे अध्यक्ष व सर्व शाखांचे विभागप्रमुख ई .मान्यवर उपस्थित होते . या कार्यशाळेचा समारोप प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या उपस्थित ,अड .संध्या बाणखेले,आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त श्रीमती मनीषाताई गावडे (माजीसरपंच गावडेवाडी)यांच्या हस्ते संपन्न झाला यामध्ये श्रीमती मनीषाताई गावडे यांनी महिलांना प्रोत्साहन देण्याकरीता त्यांनी स्फुर्ती गीत सादर केले .कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती डी.बी.त्रीमुखे यांनी केले .